वैजापूर, (प्रतिनिधी) : सुरुवातीच्या दोन महिन्यात पावसाने वैजापूर तालुक्यात दमदार आगमन केल्याने बळीराजा सुखावला आहे. २३ जुलै अखेर तालुक्यात सरासरीच्या १२९.५ टक्के म्हणजे २३५. २ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या दोन महिन्यात साधारण १८१.६ मिमी पाऊस पडतो. मात्र यावेळी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला हुलकावणी दिलेल्या वरूण राजाने नंतरच्या काही दिवसात उणीव भरून काढल्याने जुन व जुलै या दोन्ही महिन्यात पावसाने सरासरी पावसाचे आकडे ओलांडले आहेत.
दोन दिवसांपासून शहर व तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून सूर्यदर्शन झाले नाही. गुरुवारी दिवसभर कमी अधिक फरकाने पावसाची रिपरिप सुरु होती. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. या पावसामुळे तालुक्यातील लघु व मध्यम प्रकलपांच्या पाणी साठ्यात वाढ होणार असून विहिरीची पाणी पातळी देखील वाढणार आहे.
--
पर्जन्यमान :
जून ते २३ जुलै सरासरी पाऊस १८१.६ मिमी प्रत्यक्ष पडलेला पाऊस २३५.२ मिमी पावसाची टक्केवारी १२९.५, मिमीतर जुलै महिन्यात आतापर्यंत १२०.४ मिमी पाऊस पडला आहे. गारज मंडळात सर्वधिक ३०२.८ मिमी पाऊस पडला असून नागमठाण मंडळात सर्वात कमी १२७ मिमी पाऊस पडला आहे. अन्य सर्व मंडळात १०० टक्क्याहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीपात्रातून विसर्ग सुरू झाला होता.
जून महिन्यात तालुक्यात ११४.८ मंडळ निहाय पाऊस पुढील प्रमाणे :
वैजापूर
२७४.४ मिमी
खंडाळा
२००.३ मिमी
शिऊर
२६०.३ मिमी
बोरसर
२०६.४ मिमी
लोणी
२५७.९ मिमी
गारज
३०२.८ मिमी
लासूरगाव
२८६.६ मिमी
महालगाव
२१०.६ मिमी
नागमठाण
१२७.० मिमी
लाहगाव
२३७.९ मिमी
घायगाव
२३७.९ मिमी
जानेफळ
२६३.२ मिमी
बाबतारा
१९०.२ मिमी












